पती, पत्नी और वो….भाडेकरुसह फरार झाली घरमालकीण!!

प्रेमप्रकरणात जोडप्याने घरातून पळून जाऊन लग्न केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पती-पत्नी आणि तिसरा व्यक्ती अशआ प्रेम त्रिकोणाच्याही अनेक घडना घडतात. मात्र, पानीपतमध्ये पती,पत्नी और वो प्रकरणात वेगळीच घटना घडली आहे. भाडेकरूच्या प्रेमात पडलेली घर मालकीण नवऱ्याला सोडून भाडेकरुसोबत फरार झाली आहे. तसेच तिने जाताना आपल्या 10 वर्षांच्या मुलालाही सोबत घेतले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली पत्नी भाडेकरूसोबत मुलाला घेऊन फरार झाल्याचे समजल्यावर महिलेचे पती विनोद यांना धक्का बसला. त्याने पोलीस ठाण्यात भाडेकरुने आपल्या पत्नी आणि मुलाला पळवू नेल्याची तक्रार दाखल केली आहे. आपल्या घरात दोन महिन्यांपूर्वी कुलदीप नावाचा तरूण भाडेकरु म्हणून आला होता. त्याने आपल्या पत्नीला प्रमाच्या जाळ्यात फसवले आणि लग्न करण्याच्या भूलथापा देत तो तिला घेऊन पळून गेला आहे. त्यांनी सोबत आपल्या मुलालाही नेल्याचे विनोद यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

जिंद येथे राहणार कुलदीप दोन महिन्यांपूर्वी भाडेकरु म्हणून आपल्या घरात राहायला आला होता. आपल्या घराच्या बाजूला असलेल्या खोलीत तो राहत होता. तो आपल्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याचा संशय आल्याने आपण त्याला घरातून बाहेर काढले होते. मात्र, त्यानंतर तो आपल्या पत्नीला भेटत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानेच आपल्या पत्नीला लग्नाच्या भूलथापा देत पळवून नेल्याचा आरोप विनोद यांनी केला आहे.

त्या दोघांनी आपल्या 10 वर्षांच्या मुलालाही सोबत नेल्याने आपल्याला चिंता वाटत असल्याचे विनोद यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कुलदीप, विनोद यांच्या पत्नी आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच त्यांच्याबाबत माहिती मिळेल आणि त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या