जळगावात पाणीपुरीवाल्याचा ग्राहकांच्या जीवाशी खेळ; गढूळ पाण्याचा वापर

2553

सामना ऑनलाईन । जळगाव

पावसाळ्याच्या दिवसात साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छेतेबाबत अनेकदा सवाल उपस्थित होत असतात. अशा खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारे पाणी आणि पदार्थांचा दर्जा यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. जळगावात आरटीओ ऑफीसच्या बाहेर असणारा एक पाणीपुरीवाला ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून आले आहे. हा पाणीपुरीवाला पाणीपुरीसाठी गढूळ आणि दूषित पाणी वापरत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. पाणीपुरीवाल्याला दूषित पाण्याबाबत विचारले असता पाणी दूषित नसल्याचा दावा तो करत आहे. मात्र, व्हिडिओत पाणी दूषित असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

याआधीही मुंबईतील पाणीपुरीवाल्याच्या अस्वच्छेतबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कुर्ला स्थानकातील लिंबू पाणी स्टॉलचाही व्हिडिओ चर्चेत होता. आता जळगावातील पाणीपुरीवाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रशासनाने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या