पंकजा मुंडे यांच्या भेटीला भाजप नेत्यांची रीघ, ‘रॉयलस्टोन’वर खलबतं

17000

परळी या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून पराभव झाल्याने आणि पक्षानेच आपला गेम केला असा समज झाल्याने काहीशा नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टनंतर ट्विटर हॅण्डलवरून भाजपची ओळख हटवली. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून त्यांच्या मनधरणीसाठी राज्यातील नेत्यांनी धावाधाव सुरू केली आहे.

मंगळवारी माजी मंत्री बबणराव लोणीकर यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. बबणराव लोणीकर यांच्यानंतर माजी शिक्षक मंत्री विनोद तावडे आणि माजी मंत्री राम शिंदे देखील पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. गेल्या एक तासापासून त्यांची चर्चा सुरू असून पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यात या नेत्यांनी यश येते अथवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून भाजप व माजी मंत्री ही ‘ओळख’ हटवली, आता लक्ष गोपिनाथगडाकडे

12 डिसेंबरला काय बोलणार…
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आपला पुढील प्रवास ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबरला गोपिनाथगडावरून पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत अन्य नाराजही यावेळी आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या