महायुतीच्या विजयासाठी जिवाचे रान करीन – पंकजा मुंडे

3846

राज्यात शिवसेना-भाजपा महायुतीची सत्ता पुन्हा यावी यासाठी आपण जिवाचे रान करू, असे प्रतिपादन भाजपा नेत्या, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात राज्यात विविध विकासाच्या योजना राबविल्या आहेत़ या योजनांची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार सुरेश धस, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, बसवराज मंगरुळे, राम बुधावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यातील जनतेला निराशा आणि अस्वस्थतेच्या वातावरणातून बाहेर काढून महायुतीच्या सरकारने राज्याला प्रगतिपथावर आणले आहे. नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे शिवसेना-भाजप महायुतीला विक्रमी यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपने महाराष्ट्रातील चार बंडखोर नेत्यांना केले निलंबीत

यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यातील सिंचन क्षेत्र वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबरोबरच ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य सुविधा, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना घराचा लाभ शिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा लाभ, महिला कल्याण योजनांचा उहापोह केला. मराठा आरक्षणाचा जटील प्रश्नही महायुतीने सोडवल्याचेही त्या म्हणाल्या.

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाने घोषित केलेल्या 58 हजार कोटींच्या योजनांची कितपत पूर्तता झाली असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, युतीचे सरकार सत्तेवर आले त्यावेळी भीषण दुष्काळी परिस्थिती होती. ही परिस्थिती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाने कृती कार्यक्रम आखला आहे़ यामध्ये नदीजोड प्रकल्प, अन्य धरणांतील पाणी उचलणे, कृष्णा खोऱ्याचे पाणी देणे यासाठीच वॉटर ग्रीडची योजना राबविली जात आहे़ यासाठी 5 ते 7 वर्षे लागतील त्यानंतर पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही, असे आम्ही नियोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा२०१९ – हिंगोलीत ‘दुरंगी’, कळमनुरीत ‘तिरंगी’ तर वसमतला ‘चौरंगी’ लढत

आपली प्रतिक्रिया द्या