परळी – विरोधकांना कमी लेखत नाही; मनात भीती आहे, पण हवा बहिणीचीच

2964

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात राज्यात विविध विकासाच्या योजना राबविल्या आहेत. या योजनांची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार सुरेश धस, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, बसवराज मंगरुळे, राम बुधावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

सारगावच्या मेळाव्यात पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, या घोषणेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. आपण मुख्यमंत्री पदाचा दावा कधी केलेला नाही.

महायुतीच्या विजयासाठी जिवाचे रान करीन – पंकजा मुंडे

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अशी सरळ लढत होत आहे. या निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘विरोधक कोणीही असो, त्यांना कमी लेखत नाही, मनात भीती आहे, पण त्यासाठी वेळ नाही. त्यामुळे येथे फाईट चांगली होईल, मात्र हवा बहिणीची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.’

आपली प्रतिक्रिया द्या