धनंजय मुंडेच्या टीकेमुळे पंकजा उद्विग्न – प्रितम मुंडे

1822

पंकजा मुंडेवर विरोधकांनी अनेक षडयंत्र रचली, अनेक कटकारस्थाने केली तरी पंकजा खचली नाही. हीच विरोधकांची पोटदुखी आहे. सध्या पंकजा खचली नाही पण उद्विग्न झाली आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांची बहीण प्रितम मुंडे यांनी दिली आहे. शनिवारी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्यावर मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाही. मुंडे यांच्या घरी एका पत्रकार परिषदेत प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा समाचार घेतला.

प्रितम मुंडे म्हणाल्या की अशा खालच्या पातळीवर टीका केल्याने पंकजाचे मन खिन्न झाले आहे. उपस्थित जमावाला प्रितम मुंडे म्हणाल्या की आपले नाते हे फक्त निवडणुकीपुरते नाही. मुंडे साहेबांनी ते निर्माण केले, पंकजाने ते वाढवले आणि घट्ट केले.  कोणीही आपल्या माता भगिनीबद्दल कोणी असे बोलले तर आपण सहन करणार का? असा सवाल त्यांनी विचारला. पंकजा मुंडे या जनतेसाठी राजकारणात आहेत असेही प्रितम मुंडे म्हणाल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होता. त्यांनी पंकजा मुंडे यांना धीर दिल्या. तसेच घोषणा करून त्यांना पाठिंबा दर्शवला.

आपली प्रतिक्रिया द्या