पंकजा यांनी ‘ब्रीच कॅण्डी’त घेतली धनंजय मुंडेंची भेट

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारी रोजी परळीत अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांना दुखापत झाली आहे.

परळी येथील कार्यक्रम आटोपून परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यामध्ये जखमी झालेल्या मुंडे यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असून परळी आणि बीडमधील वर्चस्वावरून त्यांच्यामध्ये अनेकदा राजकीय अरोप प्रत्यारोप झाले आहेत. पण आज भाऊ संकटात असताना बहिणीने घेतलेल्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.