पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सावरगाव घाट येथे होणार

pankaja-munde

सामना ऑनलाईन । बीड

भगवान गड येथे पंकजा मुंडे यांना मेळावा घेण्यास नामदेव शास्त्री आणि प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर हा मेळावा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या भगवान बाबा यांच्या जन्मगावी घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यावर्षी भगवान गडावर मेळावा होणार नाही हे स्पष्ट झाले असून नामदेव शास्त्री आणि पंकजा यांच्यातील वादावर पडदा पडला आहे.

भगवानगडावरील दसरा मेळाव्यास मनाई

मागील महिनाभरापासून भगवानगडावर दसरा मेळावा होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. उत्सुकता वाढली असतानाच पाथर्डी तहसीलदार यांनी भगवान गडावर मेळावा घेण्यास गुरुवारी परवानगी नाकारली. त्यानंतर मेळावा सावरगाव घाट येथे घेण्याचा निर्णय झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या