आमचा प्रत्येक नेता उठतो अन् म्हणतो सरकार पडणार, पंकजा मुंडे यांचा घरचा आहेर

आमचा प्रत्येक नेता उठतो अन् म्हणतो आज सरकार पडणार, उद्या सरकार पडणार! बाहेर पडा आता यातून आणि जनतेसाठी काय करताय ते सांगा अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घरचा आहेर दिला. भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. मराठा व ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी यावेळी केली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळाव्या घेण्याची परंपरा सुरू केली. कोरोनामुळे या मेळाव्याला खंड पडला होता. यंदा हा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा आदींची उपस्थिती होती. मेळाव्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टरने गडावर आगमन झाले. हेलिकॉप्टरमधूनच त्यांनी पुष्पवृष्टी केली. आपल्या भाषणात पुष्पवृष्टीचाच संदर्भ घेत पंकज मुंडे म्हणाल्या, कोणत्याही नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी पुâले टाकली नाहीत तर भगवानबाबा व तुमच्यासाठी टाकली असे त्या म्हणाल्या.

आमचा प्रत्येक नेता दररोज उठतो आणि सरकार पडणार असे म्हणतो. सरकार पडणार, पडणार की नाही यातून बाहेर पडा आणि जनतेसाठी काय करणार हे सांगा असा घरचा आहेर पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षाला दिला. त्याबरोबरच त्यांनी राज्य सरकारकडून जनतेला अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे असे सांगितले. राज्यातील महिलांच्या सुरक्षेकडेही त्यांनी लक्ष वेधले. अतिवृष्टीग्रस्तांच्या हातात मदत पडेल याची काळजी सरकारने घ्यावी असेही त्या म्हणाल्या. मी घरात बसले आहे असा अपप्रचार सध्या चालू आहे. मी दिल्ली, मुंबई, नाशिकच्या दौNयावर असणार आहे, उसाच्या फडात जाऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

तुम मुझे कब तक रोकोगे…

मेळाव्याला येतानाच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. याचाच संदर्भ घेत त्यांनी एक कविता वाचून दाखवली.

तुम मुझे कब तक रोकोगे
मुठ्ठी में कुछ सपने लेकर
जेबों में कुछ आशाएं
दिल में अरमान यहीं
कुछ कर जाएं