दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंचे नामदेवशास्त्रींना शेवटचे पत्र

सामना प्रतिनिधी । बीड

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवटचे पत्र लिहून भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी द्या अशी विनंती केली आहे. मी कोणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होत आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मागील वर्षी दसरा मेळाव्यात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलाच वाद झाला होता. याचा संदर्भ त्यांच्या विनंतीपत्रात केला आहे. आपल्यात काय झाले या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नाही, पण दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पहिली आणि शेवटची विनंती करते आहे असे त्यांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिलेय. दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला भाषणासाठी २० मिनिटांची वेळ द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रानंतरही महंत नामदेवशास्त्री दसरा मेळाव्याबद्दल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नामदेवशास्त्री म्हणाले की, गडावर राजकीय भाषण नको हा ट्रस्टचा निर्णय आहे. त्याच्यामध्ये बदल होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या