भयंकर! बिबट्याला जिवंत जाळलं…

36
सामना ऑनलाईन । प्रतापगड

उत्तर प्रदेशमधील बाघराय गावात अज्ञात ग्रामस्थांनी बिबट्याला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी बाघराय येथील बुढेपूर येथे एक वाट चुकलेला बिबट्या गावात आला आणि त्याची गावकऱ्यांशी चकमक झाली.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. ग्रामस्थांनी त्याला तिथून हाकलायचा प्रयत्न केल्यामुळे बिबट्या धावत सुटला. धावताना चुकून एका कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्यावर गावकऱ्यांनी सुकं गवत टाकलं आणि आग लावली. या घटनेत जळलेल्या बिबट्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल येणं बाकी असलं तरी बिबट्याला जिवंत जाळल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या