पॅरा शूटर्स बेसहारा!

274

दीपा मलिक या पॅरा ऍथलीटला ‘खेलरत्न’ हा देशाचा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदुस्थानातील पॅरा ऍथलिटस्ना सन्मान मिळू लागला असे वाटत असतानाच नेमबाजी या खेळामध्ये एक चिंताजनक घटना घडली. राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये खेळाडूंच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय उपक्रमाच्या आयोजनाबाबत मतभेद झाल्याचा फटका पॅरा शूटर्सना (नेमबाज) बसला आहे. याच पार्श्वभूमीवर एनआरएआय यांनी अंग काढून घेतले असून पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने पॅरा शूटर्सची सर्व जबाबदारी स्वीकारायला हवी असे त्यांचे म्हणणे आहे. स्पोर्टस् ऍथोरिटी ऑफ इंडिया (साई) यांनी दोन्ही संघटनांना समन्स बजावले असून लवकरात लवकर समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धांमधून पॅरा लढतींना बगल देण्यात आली आहे. एनआरएआय समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पॅरा वर्ल्ड कप, पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि पॅरा ऑलिम्पिक गेम्स यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांसाठी इतर संघटनाने खेळाडूंची निवड चाचणी घ्यायला हवी. अशा प्रकारची माहिती ‘एनआरएआय’च्या वेबसाइटवर 31 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

नेमबाजीची शस्त्र आणणार कुठून?
एनआरएआयने घेतलेल्या निर्णयानंतर पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱयाने यावर टीका केली. ते म्हणाले, पॅरा शूटर्ससाठी स्पर्धा घ्यायला हरकत नाही, पण नेमबाजीसाठी लागणारी शस्त्र आम्ही आणणार कुठून? सर्व प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी थोडा अवधी जाणार आहे, पण ‘एनआरएआय’ने आम्हाला वेळच दिला नाही.

पुढच्या आठवडय़ात बैठक?
‘एनआरएआय’ या संघटनेकडेच नेमबाजीसाठी लागणाऱया शस्त्र्ाांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी जर पॅरा शूटर्सला मदत केली नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ‘साई’कडूनही ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात दोन्ही संघटनांना एकत्र घेऊन ‘साई’कडून बैठक बोलावण्यात येण्याची शक्यता आहे

आपली प्रतिक्रिया द्या