पराग अग्रवाल यांची खुर्ची धोक्यात; ट्विटरला मिळणार नवीन सीईओ

twitter

गेल्याच आठवडय़ात टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरला ट्विटर कंपनी विकत घेतली होती. आता मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन सीईओ निवडल्याची चर्चा आहे. ही व्यक्ती ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांची जागा घेणार आहे. मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. कंपनीच्या सध्याच्या व्यवस्थापनावर आपला अजिबात विश्वास नाही, असे वक्तव्य गेल्याच महिन्यात मस्क यांनी केले होते. त्यामुळे मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी जाताच कंपनीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळतील अशी चर्चा होती. हा अंदाज आता खरा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.