परळी – नुकताच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने शहरात खळबळ

2162

परळीत रेल्वे पटरीच्या बाजूला नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक काट्याच्या झुडपात आणून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. रात्री 8 च्या सुमारास पटरी जवळून जात असताना काही लोकांच्या नजरेत हे बाळ आल्याने त्यांनी या बाळाला उपजिल्हा रुग्णाल परळी येथे दाखल केले आहे. या अर्भकाला इथे कोणी आणून टाकले, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही आहे. मात्र या चिमुकलीचे पालकत्व खा.सुप्रिया सुळे व मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारले आहे. त्यांच्यावतीने डॉ. संतोष मुंडेंनी तत्काळ रुग्णालयात भेट घेऊन परिस्थिती हाताळळी.

सदरील प्रकार राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना समजताच त्यांनी या मुलीच्या प्राथमिक उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी फोनवरून सूचना दिल्या. तसेच खा.सुप्रिया सुळे यांनाही याबाबत माहिती दिली आणि मुलीचे पालकत्व स्वीकारत असल्याचे सांगितले. सदरील अर्भक काटेरी झुडपात टाकण्यात आले असल्याचे समजते. या निर्दयी प्रकार नेमका कोणी केला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही आहे. मात्र या प्रकाराने परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या