कांद्याचा पराठा

138

साहित्य : एक वाटी कणिक, ६ कांदे, एक लहान चमचा वाटलेली बडीशोप, २ लहान चमचे मीठ, अर्धा लहान चमचा लाल तिखट, २ लहान चमचे गरम मसाला, आवश्यकतेनुसार तूप.

कृती : सर्वप्रथम कांदा चिरून घ्या. एका कढईत दोन मोठे चमचे तूप गरम करून तो परता. कांदा गुलाबी परतल्यावर गरम मसाला, लाल तिखट, बडीशोप व मीठ घाला. कांदा एकदम गार होऊ द्या. कणिक मीठ टाकून मळून घ्या. अर्धा तास पीठ झाकून ठेवा. लहानलहान पेठे घेऊन लाटा. लाटून त्याच्यावर तूप लावा. थोडेसे कांद्याचे मिश्रण मधोमध ठेवून बाजूने पीठ ताणून मिश्रण झाका व लाटा. दोन्ही बाजू तव्यावर तूप लावून चांगल्या भाजा.

आपली प्रतिक्रिया द्या