पाथरी- कंपनी अधिकार्‍यास डांबून ठेवले; भाजपच्या शहराध्यक्षासह दोन आरोपींना अटक

थकीत ग्राहक कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या कंपनीच्या अधिकार्‍यास मारहाण केल्याची घटना परभणीतील पाथरी येथे घडली आहे. अधिकाऱ्याला मारहाण करत डांबून ठेवून आणि शास्त्राचा धाक दाखवून धमकी देत जबरदस्तीने 10 लाख रुपये भरल्याची पावती बनवून घेण्यात आली.

या प्रकरणी संतोष जोगदंड याच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी भाजप शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांच्यासह आणखी एकास घरातून अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

पाथरी येथील संतोष सावळराव जोगदंड याने श्रीराम फायनास कंपनीकडून 5 ऑक्टोबर 2015 रोजी 8 लाख 29 हजार 517 रुपये गृहकर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड झाली नसल्याने कर्ज खाते थकीत जाऊन एनपीएमध्ये गेल. 17 ऑक्टोबर 2017 रोजी ही रक्कम 14 लाख 92 हजार 384 रुपये ऐव्हडी झाली.

थकीत रक्कम वाढल्याने श्रीराम फायनान्स कंपनीने हे प्रकरण वासुलीसाठी मुंबई येथील असेंट रिकन्स्ट्रॅक्टशन कंपनीकडे वसुलीसाठी दिले होते. या कंपनीने 19 जुलै 2017 रोजी कर्जदार यास नोटीस पाठवून कर्ज रक्कम भरण्याचे कळवले होते. त्यानंतर प्रकरणी परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झाले होते.

कंपनीच्या थकीत कर्ज वसुलीसाठी सय्यद सोहेल इकबाल हे 17 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास कर्जदार संतोष जोगदंड यांच्या घराकडे आले होते. मात्र ज्या मिळकतीवर कर्ज घेतले त्या ठिकाणी साठेनगर पाथरी येथे एक वृद्ध माहिला राहत असल्याचे समजल्याने वसूल अधिकार्‍याने संतोष जोगदंड यांचा फोन न घेऊन त्याना कॉल केला.

काही वेळात इतर काही जणासोबत संतोष जोगदंड घटनास्थळी आले. त्याने वसुली अधिकार्‍यास ‘मी कोण आहे, तुम्ही मला ओळखत नाहीत’ म्हणत मोबाईल हिसकावून घेत त्यांना मारत त्यांचा चश्मा फोडला. त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या प्रशांत याने बाजूच्या घरातून कुर्‍हाड आणि लोखंडी रॉड आणला.

मारहाण करून धमकी दिली

संतोष जोगदंड यांनी आणि इतर तिघांनी मिळून वसूल अधिकार्‍याच्या गाडीची चावी हिसकावून घेत त्याच्याच गाडीत जबरदस्तीने बसवून पाथरी-मानवत रस्त्यावर असलेल्या एका धाब्यावर घेऊन गेले. त्या नंतर वसुली अधिकार्‍याच्या बॅग मधील सामानाची तपासणी करून ‘कर्ज फेडल्याची पावती फाडून दे नसता कारसह जिवंत जाळून टाकुत’ अशी धमकी देऊन 10 लाख रुपये भरणा केल्याची पावती फाडून घेतली.

त्यानंतर ‘शहरात परत पाय ठेवला तर मारून टाकेन’ अशी धमकीही दिली. अधिकार्‍याने ही बाब वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगून 22 ऑक्टोबर रोजी पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संतोष जोगदंड, प्रशांत थोरात यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह.

रात्री 12 वाजेच्या सुमारास आरोपी संतोष जोगदंड, प्रशांत थोरात यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. दरम्यान आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या