कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

302

सामना ऑनलाईन। परभणी

पूर्ण तालुक्यातील कामखेड येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पूर्ण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माणिकराव बाबाराव कोठारे ( 65 ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पूर्ण तालुक्यातील कानडखेडा येथे राहणाऱ्या माणिकराव यांच्यावर बँकेचे कर्ज होते. पण कर्ज फेडणे माणिकराव यांना कठीण झाले होते. खरिपाच्या हंगामात शेतातील सोयाबीन कापूस वाया जाण्याची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बाबाराव कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूर्ण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंधक वाड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या