परभणीतील जुगार अड्डयावर धाड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

560

परभणी येथील गंगाखेडरोड वरील एका बंद असलेल्या दालमिलवर पोलिसांनी बुधवार, 27 मे रोजी रात्री उशिरा धाड टाकून तेथे जुगार खेळत असलेल्या बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 6 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या जुगार खेळणाऱ्यामध्ये शहरातील अनेक प्रतिष्ठीत व्यापारीवर्गासह इतरांचा समावेश आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गंगाखेड रस्त्यावर एका नर्सरी समोर जुगलकिशोर दरक यांच्या बंद असलेल्या दालमिलच्या मोकळ्या जागेत मोठा जुगार चालू असल्याची महिती पोलिसांना मिळाली. त्यावरून बुधवार, 27 रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या एक विशेष पथकाने येथे धाड टाकली असता तेथे जुगार खेळत असलेल्या एकूण बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून सुमारे 8 लाख 6 हजार 40 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, मोबाईल व दुचाकींचा समावेश आहे. या बारा आरोपींवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. गंगाखेड रस्त्यावरील एका बंद दाल मिलच्या आवारात काल राञी जुगार खेळणारे बारा प्रतिष्ठित व्यापारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विषेश पथकाने ताब्यात घेतले आहेत.

त्यात जुगलकिशोर दरक, सुनिल मोदानी (रा. खानापूर फाटा), लक्ष्मीकांत कुलथे (रा. रमाबाई नगर), अमोल राठी (रा. परसावतनगर ), दत्ता मुखरे (रा.विकासनगर ), राहूल भंडारी (रा.परसावतनगर), जयप्रकाश लड्डा (रा.नवा मोंढा), राजगोपाल कासट (रा.विसावाकॉर्नर ), राजू गव्हाणे (रा. महात्मा गांधी नगर), सोपान देशमुख (रा. त्रिमूर्तीनगर ), चेतन मुदंडा (रा. स्टेशन रोड), व रितेश झांबड (रा. सुपर मार्केट) आदींचा समावेश आहे. यांच्याकडुन या पथकाने रोख रक्कम व एकूण मुद्देमाल जप्त केला.

परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी परभणी जिल्ह्यातील नामवंत प्रतिष्ठित बुरख्याखाली जुगार खेळणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. बड्या बड्या धेंडांना आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी पथके तयार केली आणि परभणी शहर आणि जिल्ह्यातील नामवंत प्रतिष्ठित आरोपींच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. पांचाळ, अप्पर पोलीस आधीक्षक रागसुधा आर.,सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमान काछवे, सखाराम टेकुळे, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, वनोले, महिला पोलीस पूजा भोरगे आदींनी सहभाग घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या