लॉकडाऊनमध्ये पोलिसांची कामगिरी, पावणे दोन कोटींच्या वाळूसह 47 लाखाची दारू जप्त

616

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये पोलिसांच्या विविध शाखांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 79 लाखांची वाळू जप्त करण्यात आली, तर तब्बल 46 लाख 92 हजार रुपयांची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली आहे. त्याच बरोबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाळूची तस्करी करणाऱ्या 123 जणांविरुद्ध 35 गुन्हे दाखल केेले.

मार्च पासून परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पोलीस प्रशासनाने धडक कारवाईस सुरूवात केली. प्रामुख्याने अवैधधंद्यामध्ये दारू विक्री, तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, गांजा या प्रमुख बाबींवर लक्षकेंद्रीत करताना जिल्ह्यातील वाळू तस्करीवरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. याचाच परिणाम कोट्यावधी रुपयांचा साठा जप्त होण्यास झाला. आतापर्यंतच्या 4 लॉकडाऊनमध्ये हे अवैधधंदे मोठ्या प्रमाणावर चोरट्या पध्दतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. 31 मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने पोलिस प्रशासनाच्या कारवायां धडकेबाज ठरू लागल्या आहेत. हातभट्टीची दारू अवैधरित्या विक्री करणाऱ्या 129 जणांविरूध्द छापे मारून 102 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

46 लाख 92 हजार 618 रुपयांचा हा दारूसाठा जप्त करण्याच्या कारवाईत पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने कामगिरी बाजावली. गांजा विक्री करणा या दोघा जणांविरूध्द गुन्हा दाखल करून 40 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

तसेच स्थानिक गुन्हा शाखेने 840 किलो बनावट खवा जप्त करून पाच जणांविरूध्द नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तंबाखूजन्य पदार्थाच्या अवैधविक्रीवरही कारवाई करीत 40 जणांविरूध्द 22 गुन्हे दाखल करून 22 लाख 70 हजार 660 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे . पावणे दोन कोटीची वाळू जप्त लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या पात्रासह अन्य छोट्या नद्यातूनही अवैध वाळूचा उपसा बेसूमारपणे करण्यात आला . यात गोदावरी काठावरील शेतांमध्ये या वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी या अवैधवाळू साठ्यांवर व वाहतुकीवर केलेल्या कारवाईत 123 आरोपी विरूध्द 35 गुन्हे दाखल करून 1 कोटी 79 लाख 96 हजार 300 रुपयांची वाळू जप्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या