परभणी बिडीओच्या खुर्चीला जोड्याचा हार

12

सामना प्रतिनिधी । परभणी

पंचायत समिती परभणीचे प्रभारी गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे तुंबलेली कामे व गैरव्यवहाराच्या आरोपामुळे आज संतप्त झालेल्या सरपंच संघटनेच्या परभणी शाखेच्या वतीने त्यांच्या खुर्चीला चप्पला व जोड्यांचा हार घालण्यात आला. पंचायत समिती कार्यालयातील त्यांच्या कक्षात झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.

प्रभारी गटविकास अधिकारी करडखेलकर हे जाणिवपूर्वक विविध विकास कामांच्या फाईलीवर स्वाक्षरी करत नव्हते. जाणिवपूर्वक फाईली आडवून ठेवण्याचा आरोप त्यांच्यावर अनेकवेळा झालेला आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहाराचा आरोपही त्यांच्यावर सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सरपंच मंडळी दररोज परभणी पंचायत समितीत आपल्या विविध कामांसाठी येतात. त्यांना बिडीओंशी चर्चा करावयाची असते. परंतु, करडखेलकर हे पंचायत समितीमध्ये नेहमीच गैरहजर राहत होते. त्यामुळे सरपंच मंडळी संतापती होती. अखेर आज करडखेलकर यांच्या रिकाम्या खुर्चीला सरपंचांनी चप्पल-बुटांचा हार घालून आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. सरपंच संघटनेचे एैश्वर्य विजयराव वरपुडकर यांनी या आंदोलनात पुढकार घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या