अमानुष क्रौर्य : कोल्हापूरमध्ये ‘नकोशी’ला विष देऊन केले ठार

21
girl-child

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये एका दांपत्याला दुसरी मुलगी झाली म्हणून दोन महिन्याच्या मुलीला विष देऊन तिला ठार करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडीतील ही धक्कादायक घटना असून पोलिसांनी आई वडिल असे दोघांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना १५ दिवसांची पोलीस कोठडडी सुनावली आहे.

प्रकाश पडवे आणि जयश्री पडवे हे दांपत्य शाहुवाडी तालुक्यातील सावर्डी गावात राहत होते. त्यांना आधीच दोन वर्षाची मुलगी आहे. नंतर त्यांना दुसरी मुलगीच झाली. दुसरी मुलगी झाली म्हणून दोघेही नाराज होते. म्हणून त्यांनी तिला मारण्याचा बेत आखला

चार ऑक्टोबर रोजी प्रकृती खालावल्याप्रकरणी या मुलीला पडवे दांपत्यानी इस्पितळात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे गरजेचे होते. परंतु मुलीच्या वडिलांनी त्यासाठी विरोध दर्शवला. त्यावर डॉक्टरांना या प्रकरणी संशय वाटला. नंतर शवविच्छेदनाच्या अहवलात विषप्रयोगामुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. पोलीस तपासादरम्यान दुसरी मुलगी झाल्याने आपण हे कृत्य केल्याचे दोघांनी कबूल केले.

आपली प्रतिक्रिया द्या