आई -वडील मूक बधिर , मुलगा करणार फ्रान्समध्ये संशोधन

170

सामना ऑनलाईन | कोलकाता

आई आणि वडील दोघेही मूकबधिर ,घरात मोठी गरिबी अशा प्रतिकूल परिस्थतीत पश्चिम बंगालच्या सूरी गावातील एका विद्यार्थ्याने फ्रान्सच्या विद्यापीठाची फेलोशिप मिळवली आहे. फ्रान्सच्या स्टार्टबर्ग विद्यापीठात ऑरगॅनो मेटॅलिक केमिस्ट्री या विषयात संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या या गुणी विद्यार्थ्यांचे नाव आहे अग्निद्विप दास. अग्निद्विपचे आई -वडील दोघेही जन्मानेच मूक-बधिर आहेत. त्यांचे सुरीतील पुरंदरपूर मार्केटमध्ये टेलरिंगचे दुकान आहे. या दुकानाचे नावही “डेफ अँड डम्ब टेलर रूम” असे आहे.

agnidwips-mother-and-father

अग्निद्विपने त्याचे शिक्षण दुसऱ्यांची जुनी पुस्तके वापरत पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने विश्वभारती विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी मिळवली. पदव्युत्तर परीक्षेत रसायनशात्रात ८४.९ टक्के मार्क मिळवत त्याने इंदूर आयआयटीत प्रवेश मिळवला. अग्निद्विपने रसायनशात्रात सादर केलेल्या प्रोजेक्टला फ्रान्सच्या स्टार्टबर्ग विद्यापीठाने शिष्यवृत्ती दिली आणि त्याला संशोधनासाठी फ्रान्सला बोलावले आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून अग्निद्विपचे संशोधन सुरु होणार आहे. आपल्या या उज्वल यशाची आनंदी बातमी मी माझ्या मूक-बधिर आई आणि वडिलांना ऐकवू शकत नाही याचेच दुःख होतेय असे,  अग्निद्विपने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या