धक्कादायक! अवघ्या 200 रुपयात इथे पालक विकताहेत आपली मुलं

657

शीर्षक वाचून बुचकळ्यात पडला असाल. संताप आला असेल. आपल्या पोटचा गोळा कुणीही पालक असा कसा काय विकू शकतो? पण, हो. हे खरं आहे. अवघ्या 200 रुपयांना मुलं विकून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आफ्रिकेतील गाम्बिया या देशात हा भयंकर प्रकार चालल्याचं वृत्त आहे. अनेक परदेशी लोकं सध्या गाम्बिया देशात पर्यटक म्हणून दाखल झाले आहेत. त्यांना आकर्षित करण्याकरता लहान मुलांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. हे पर्यटक अवघ्या 200 रुपयांत लहान मुलांना खरेदी करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहेत. अनेक रिसॉर्ट्सवर मोठ्या प्रमाणात हे प्रकार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे काही पालक या मुलांना स्वखुशीनेच हे कृत्य करायला भाग पाडत आहेत. तर काहींना याची कल्पना नसल्याचं आढळलं आहे.

गॅम्बिया या देशात भयंकर गरिबी आहे. त्यांचं सगळं उत्पन्न हे पर्यटकांवर अवलंबून आहे. काही काळापूर्वीच थॉमस कुक नावाची पर्यटन कंपनी बंद झाली. त्याचा थेट परिणाम गॅम्बियातल्या पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पर्यटक कमी झाल्यामुळे स्थानिकांची आर्थिक आवक घटली आहे. त्यामुळे अनेक जण नाईलाजाने लहान मुलांना विकून पैसे कमवत आहेत. गॅम्बिया सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचं आढळलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या