नागपुरात परिणय फुके आणि नाना पटोले समर्थकांमध्ये हाणामारी

581

भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा तुफान हाणामारी झाली. या घटनेत परिणय फुके यांचे बंधू नितीन फुके आणि नाना पटोले यांचे पुतणे जीतेंद्र पटोले गंभीर जखमी झाले आहेत. हाणामारीनंतर दोन्ही गटांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या साकोलीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

जीतेंद्र पटोले यांनी नितीन फुके यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना साकोलीतील रुग्णालयात दाखल केले. रात्री पैशांचे वाटप होत असल्याचा नाना पटोले यांच्या समर्थकांचा आरोप होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. त्यानंतर परिणय फुके यांच्या समर्थकांनी जीतेंद्र पटोले यांना बेदम मारहाण केल्याने तेही गंभीर जखमी झाले. परिणय फुके यांच्या तक्रारीवरून नाना पटोले आणि त्यांचे बंधू यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा तर नाना पटोले यांच्या तक्रारीवरून फुके यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या