परिणीतीने 16 ऑगस्टला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, नेटकरी म्हणाले असं कसं चालेल दिदी?

787

अभिनेत्री इशा गुप्ताने स्वातंत्र्यदिनाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केल्यानंतर आता नेटकऱ्यांनी परिणीती चोप्राकडे मोर्चा वळवला आहे. परिणीतीने 15 ऑगस्ट ऐवजी 16 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने तर ‘असं कसं चालेल दिदी’ असं म्हणत तिला ट्रोल केले आहे.

परिणीतीने स्कुबा डायव्हिंग करत पाण्याखाली झेंडा फडकवतानाचा तिचा काही महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओसोबत तिने देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र परिणीतीने 15 ऑगस्टच्या ऐवजी 16 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या