Photo – ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरने घेतली राहुल गांधी यांची भेट

Paris Olymics 2024 मध्ये सलग दोन वेळा कांस्यपदक जिंकत इतिहास घडवला. दुहेरी पदक विजेती मनू भाकर बुधवारी मायदेशी परतली. मनू भाकर शुक्रवारी नवी दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.

या भेटीवेळी मनू सोबत तिचे पालक आणि प्रशिक्षकही उपस्थित होते. तसेच राहुल गांधी यांना मिठाई दिली.

बुधवारी हिंदुस्थानात परतल्यानंतर नवी दिल्लीतील एअरपोर्टवर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांची राष्ट्रीय अधिकृत निवासस्थानी भेट घेतली.

10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सरबज्योत सिंहच्या साथीने पुन्हा एकदा कांस्यपदक जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली हिंदुस्थानी खेळाडू ठरली आहे.