Paris Olympic 2024 मध्ये हिंदुस्थानने आतापर्यंत तीन कांस्य पदकं कमावली असून ही पदकं आपल्याला नेमबाजीत मिळाली आहे. आता आणखी एक आनंदाची बातमी ऑलिम्पिक नगरीतून आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचा महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कारण प्रथमच महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
राऊंड ऑफ 16 स्पर्धेत हिंदुस्थानने रोमानियाचा 3-2 असा पराभव केला. हिंदुस्थानने पहिले दोन सामने जिंकले आणि पुढचे दोन गमावले. त्यानंतर मनिका बत्राने निर्णायक सामना जिंकला.