मागील काही ऑलिम्पिकपासून हिंदुस्थानला कुस्तीमध्ये सातत्याने पदके मिळत आहेत. उद्यापासून (दि. 5) सुरू होत असलेल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटकडून हिंदुस्थानला पदकाची अपेक्षा असून सर्वांच्या नजरा जिच्यावर आहेत, विनेश फोगाटने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन, राष्ट्रकुल स्पर्धेत तीन व आशियाई स्पर्धेत आठ पदकांची लयलूट केलेली आहे, मात्र तिच्या खात्यात ऑलिम्पिकमधील एकही पदक नाहीये. तिच्या मार्गात चार वेळची जगज्जेती युई सुझाकी, चार वेळची ऑलिम्पिक पदकविजेती मारिया स्टॅडनिक, टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सारा हिल्डेब्रांट व दोन वेळची जगज्जेती डोलगोरजाविन ओटगोंजरगल यांचा अडथळा असेल.