Paris Olympic विनेश फोगटची जबरदस्त कामगिरी, फ्रीस्टाइल कुस्तीच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश

vinesh phogat

विनेश फोगटने महिलांच्या फ्रीस्टाइल कुस्ती 50 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ओक्साना लिवाचचा पराभव करत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. ओक्सानाने शेवटच्या क्षणी विनेशवर दबाव आणण्याच प्रयत्न केला. पण विनेश फोगटने तिला संधी दिली नाही आणि उपात्य फेरीत धडक मारली.

विनेश फोगटने ओक्साना हिला 7 – 5 अशी मात दिली.

दरम्यान, आज रात्री उपांत्य फेरीत तिचा पुढील सामना गॅबिजा डिलिटे किंवा युस्नेलिस लोपेझ यांच्याशी होईल.