परळीच्या आरती पोरवालचे JEE परीक्षेत नेत्रदीपक यश, 99.81 टक्के गुण मिळवून देशात 124वा क्रमांक

अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत परळीच्या सुकन्येने घवघवीत यश मिळवले आहे. JEE या परीक्षेत 99.81% गुण मिळवून तिने देशपातळीवर 123वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

परळी वैजनाथ येथील सर्वपरिचित पोरवाल कुटुंबातील आरती सुरेश पोरवाल हिने JEE या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. JEE (B Arch) परीक्षेत 99.81% गुण मिळवून देशपातळीवर 123वा क्रमांक मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. आरती पोरवाल हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.