संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर ते ५ जानेवारी

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपायी रखडलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या १५ डिसेंबरपासून म्हणजे गुजरातमधील मतदानाचा दुसरा टप्पा १४ डिसेंबरला पार पडल्यानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. हे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत चालेल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. तसा निर्णय बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान, संसद अधिवेशन आणि गुजरात निवडणुकीतील मतदानाच्या तारखा यांची ‘चकमक’ उडू नये, याची काळजी सरकार घेत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या