
नगर पारनेर येथील बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठावलेल्या 20 वर्षांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.जी. आवचट यांनी स्थगिती देत आरोपीला 15 हजारांच्या जातमुचक्यासह अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला.
पीडिता ही घटनेच्या वेळी बारा वर्षांची होती. पीडितेचे आई-वडील मेंढपाळासाठी वेगवेगळ्या गावात असतांना पीडिता ही आजोबांकडे राहत होती. दरम्यानच्या काळात पीडितेचे पोट दूखत असल्याने तिला पुण्यातील मोठ्या रुग्णालयात दाखविण्यात आले असता ती अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉवटरांच्या तपासात समोर आले. प्रकरणात पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपी हिरामण तिखोले याच्याविरोधात भादंवी कलम बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगर सत्र न्यायालयाने आरोपी हिरामण तिखोले याला 25 ऑगस्ट 2022 रोजी 20 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
याविरोधात आरोपी हिरामण तिखोले याने अॅड. शशिकांत शेकडे यांच्यामार्फत खंडपीठात अपील दाखल केले व अपीलाचा निर्णय लागेपर्यंत जामीन देण्यात यावा अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. प्रकरणात अॅड. शेकडे यांना अॅड. सतीश गुगळे व अॅड. पृथ्वीराज ढाकणे यांनी सहकार्य केले.