पोपटाने केली ऑनलाइन शॉपिंग!

37

सामना ऑनलाईन, लंडन

लंडनमध्ये  राहणाऱया कोरीन पिटोरियस या महिलेच्या घरी एके दिवस अचानक शॉपिंग पार्सल पोचले. ते कुणी ऑर्डर केले, हे तिला काही समजेना. तिला वाटलं की, नवऱयाने किंवा तिच्या आठ वर्षांच्या मुलाने ऑनलाइन शॉपिंग साइटवरून ते ऑर्डर केले असावे. मात्र तसे झाले नव्हते. कोरिनने ऑर्डर कुणी दिली, त्याचा शोध घेतला. जेव्हा कोरिनला सत्य समजले तेव्हा हसून हसून तिची वाट लागली. तिच्या पाळीव पोपटाने ती आर्डर दिली होती म्हणे. पोपटाच्या पिंजऱयाजवळ व्हाईस कंट्रोल गॅझेट ठेवलेले आहे. अलास्का नावाने या गॅझेटवरून ऑनलाइन शॉपिंग साईट ऍमेझॉनवर खरेदी केली. पोपटाने गॅझेटवर आपल्या आवाजात ऑर्डर नोंदवली. ती कंपनीकडून स्वीकारण्यात आली. रजिस्टर करण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या