पार्थ पवार सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला

1135

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतल्याचे वृत्त आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. त्यावर पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. माझ्या नातव्याच्या बोलण्याला काडीची किंमत देत नाही असे शरद पवार म्हणाले होते. त्याच रात्री अजित पवार, जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी गुरुवारी ध्याकाळी सिव्हर ओकवर जाऊन सुप्रिया सुळे यांना भेटले. यावेळी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली.

जयंत पाटील काय म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या सर्व घडामोडींबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही. पक्ष एकसंघ आहे. पार्थ पवार व अजित पवारही नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या