सरकारी जमिनींवर मशिदी उभारल्या, उपराज्यपालांकडे तक्रार

16

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये सरकारी जमिनींवर मशिदी आणि दफनभूमी उभारण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केला आहे. याच संदर्भात वर्मा यांनी गुरुवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली होती. वर्मा यांनी बैजल यांना कोणत्या सरकारी जमिनींवर मशिदी आणि दफनभूमी उभारण्यात आल्या आहेत त्याची यादीच सादर केली आहे. वर्मा यांच्या म्हणण्यानुसार 54 अशा जागा आहेत जिथे या मशिदी आणि दफनभूमी उभारण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी वर्मा यांनी केली आहे.

वर्मा यांनी बैजल यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की त्यांनी ज्या जागांची यादी त्यांना सादर केली आहे, त्यांचा दौरा त्यांनी स्वत: केला आहे. ज्या जमिनींवर ही अतिक्रमणे झाली आहेत त्या जागा त्यातील बहुतांश जागा या  दिल्ली महानगरपालिकेच्या ताब्यातील आहेत. या जागा मैदाने, सार्वजनिक शौचालये आणि इतर कारणांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. आपण केलेल्या सर्वेक्षणातील तथ्ये खरी आहेत की नाही हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी आणि अन्य अधइकाऱ्यांची एक चौकशी समिती नेमावी आणि त्यांच्या मार्फत अधिकृत सर्वेक्षण करून घ्यावे अशी मागणी वर्मांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या