नायगाव स्थानकात प्रवाशांचा रेलरोको; पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

14

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई लोकलच्या रोजच्या समस्यांमुळे वैतागलेल्या मुंबईकरांचा आज नायगावमध्ये उद्रेक झाला. ऐन गर्दीच्या वेळी लोकल रद्द केल्याने नायगावमध्ये प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत रेल्वे रुळावर उतरून रेलरोको केला. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक तासभर विस्कळीत झाली. चर्चगेटकडे येणाऱ्या लोकल एकामागोमाग खोळंबल्या.

रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता सकाळी ७.५० वाजताची वसई-अंधेरी लोकल रद्द केली, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. अचानक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांना संताप अनावर झाला. त्यामुळे त्यांनी थेट रेलरोको करून आपली रेल्वे प्रशासनावरची नाराजी व्यक्त केली. सुमारे अर्धा तास प्रवाशांनी लोकल अडवून ठेवल्या.

आपली प्रतिक्रिया द्या