मुंबई – बसण्याच्या जागेवरून वाद, धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला बाहेर फेकले

2644

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दीच्या वेळी सहप्रवाशांमध्ये अनेकदा वाद होतात. याच वादातून एका 35 वर्षीय तरुणाला धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. विजयकुमार राममिलन गुप्ता असे या तरुणाचे नाव असन तो चर्नीरोड येथे लग्नाच्या पत्रिका छापण्याच्या कंपनीमध्ये कामाला आहे. धावत्या लोकलमधून पडल्याने जखमी झालेल्या विजयकुमार यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मानखुर्दे येथील अन्नाभाऊ साठेनगरमध्ये राहणाऱ्या विजयकुमार यांनी गुरुवारी सकाळी 9.30 वाजताची सीएसटीकडे जाणारी लोकल पडकली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गाडी टिळकनगर रेल्वे स्थानकावर आल्यानतंर गाडीतील तीन ते चार प्रवाशांसोबत बसण्याच्या जागेवरून विजयकुमार यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात आरोपींनी विजयकुमारला धावत्या लोकलमधून धक्का दिला.

आरोपींनी धक्का दिल्यने विजयकुमार रेल्वे ट्रॅकवर पडले. दुर्घटनेमध्ये विजयकुमार यांच्या उजव्या हाताचे हाड तुडले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विजयकुमार यांच्या पत्नी नितू गुप्ता (28) आणि पुतण्या रवि गुप्ता (25) यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vijaykumar1

दरम्यान, वादाचे नेमके कारण समोर आले नसले तरी गर्दीत धक्का लागल्यामुळे भांडण झाल्याची प्राथमिक शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलीसांनी अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या