पाटणमध्ये 113 ग्रामपंचायतीपैकी 71 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटण मतदारसंघात एकूण 113 ग्रामपंचायतीपैकी 71 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. जवळपास 530 सदस्य शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत.

113 ग्रामपंचायतीमध्ये 6 ग्रामपंचायतीमध्ये समसमान उमेदवार विजयी झालेले आहेत. पहिल्या टप्प्यात पाटण मतदारसंघात एकूण 119 ग्रामपंचायतीपैकी 36 ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून आल्या होत्या यामध्येही शिवसेनेने 21 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली बाजी मारली होती.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आलेल्या 71 ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांनी शंभूराज देसाईंची दौलतनगर येथे प्रत्यक्ष भेट घेतली. शंभूराज देसाईंच्या भेटीकरीता 530 सदस्यांनी गर्दी केली होती.

सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला पाटण तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायती मिळाल्या असून शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सर्वाधिक पाटण तालुक्यात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या