आयपीएल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीत पतंजलीची उडी

1381

बीसीसीआयने हिंदुस्थान – चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर वीवो कंपनीसोबतचा करार मोडीत काढला. त्यामुळे यंदाच्या आयपीएलसाठी नवा प्रायोजक अर्थातच स्पॉन्सरचा शोध सुरू झाला. आता योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीनेही आयपीएलच्या स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 18 ऑगस्टला बीसीसीआयकडून नव्या स्पॉन्सरच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सोमवारी दिली.

आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी जिओ, बायजू, ऍमेझॉन, कोका कोला या कंपन्यामध्ये चुरस असून आता पंतजलीचाही यामध्ये समावेश झाला आहे. बीसीसीआयला वीवोकडून वर्षाला 440 कोटी मिळत होते. पण कोरोनामुळे बाजारातील मंदी लक्षात घेता बीसीसीआय 60 टक्के कमी किमतीत ही स्पॉन्सरशिप देण्यास तयार आहे. एकूणच काय तर पतंजली या कंपनीने स्पॉन्सरशिप मिळवल्यास त्यांना 260 कोटी रूपयांना आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळू शकते.

युएईत आयपीएलच्या आयोजनासाठी केंद्र सरकारकडून लेखी परवानगी

219 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्यासाठी केंद्र सरकारकडून लेखी परवानगी मिळाल्याची माहिती आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सोमवारी दिली. 20 ऑगस्टनंतर बहुतांशी संघ युएईला रवाना होणार आहेत. त्याआधी संघातील प्रत्येकाला दोन कोरोना चाचणीला सामोरे जावे लागेल, असेही ते पुढे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या