हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांनी ‘हे’ फळ रोज खावे, अनेक आजारांपासून राहाल दूर

हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाबाची समस्या ही हल्ली सर्वसामान्य समस्या झाली आहे. यामध्ये ह्रदयातून शरीराच्या इतर भागात रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमधील रक्तदाब वाढतो. यामुळे मूत्रपिंड, फुफ्फुस आणि ह्रदयाला धोका पोहोचण्याची शक्यता असते.

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी समतोल आणि पौष्टिक आहार घेतल्यास तसेच दिनचर्या, ऋतुचर्येचं पालन आणि नियमित व्यायाम यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. सामान्य रक्तदाबाची पातळी 120/80 mmHg किंवा त्यापेक्षा किंचित कमी असते, पण जर रक्तदाब खूप जास्त असेल तर आहार आणि जीवनशैली याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

याविषयी आहारतज्ज्ञांचे मत आहे की, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी कमी चरबीयुक्त आणि कमी कोलेस्ट्रॉलयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. याशिवाय तज्ज्ञ म्हणतात, हायपरटेंशन कमी करण्यासाठी फळे, भाज्यांचं सेवन करणे आवश्यक आहे; कारण यामध्ये फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. हायपरटेंशन दूर करण्यासाठी ‘केळी’ खाल्ल्यान जास्त फायदा होतो. जाणून घेऊया, केळी खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यासाठी काय फायदा होतो.

फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. यामध्ये फायबर, जीवनसत्त्व सी जास्त प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्याकरिता मदत करते. यामुळे ह्रदयविकाराचा धोका टळतो.

अँण्टिऑक्सिडंट्सने समृद्ध
केळ्यात विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे विविध प्रकारचे आजार आणि संसर्गापासून रक्षण होण्याकरिता मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी केळी हा नैसर्गिक स्त्रोत आहे.

पोटॅशियमचे प्रमाण जास्त
केळ्यात पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. यामुळे हायपरटेंशन दूर करण्यासाठी केळी खाणे हा उत्तम पर्याय मानला जातो. केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशियम हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. एका मध्यम आकाराच्या केळ्यात 450 ग्रॅम पोटॅशियम असते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

सोडियम कमी होते
केळीमध्ये सोडियमचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पोटॅशियमने समृद्ध असलेल्या गोष्टी तुम्ही जितक्या जास्त खातात तितके सोडियम तुमच्या शरीरातून बाहेर पडते.

उच्च रक्तदाबामध्ये केळीचे सेवन कसे करावे-
हायपरटेन्शनचे रुग्ण आहारात विविध पद्धतीने केळ्याचा समावेश करू शकतात. फक्त केळं किंवा त्यापासून तयार केलेली स्मूदी, मिल्क शेक असे विविध प्रकारे आहारात केळ्याचा समावेश करता येईल. सकाळी नाश्त्याच्या वेळीही केळी खाऊ शकता.