पत्रादेवी ते मोपा विमानतळ रस्त्याला स्वातंत्र्यसैनिक ‘करनैल सिंग बनीपाल’ यांचे नाव

15 ऑगस्ट 1955 रोजी पत्रादेवी येथे पोर्तुगीजांविरुद्ध सत्याग्रहादरम्यान गोळीबारात शहीद झालेल्या करनैल सिंग यांचे नाव पत्रादेवी ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या महामार्गाला दिले जाणार आहे. हा रस्ता स्वातंत्र्यसैनिक ‘करनैल सिंग बनीपाल’ नावाने ओळखला जाईल,अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीजांविरुद्ध लढताना करनैल सिंग शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ रस्त्याचे नामकरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हरियाणामधील अंबाला येथे स्वातंत्र्यसैनिक ‘करनैल सिंग बनीपाल’ यांची भेट घेतली. त्यानंतर सावंत यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, शहीद करनैल सिंग यांच्या कुटुंबियांच्या विनंतीनुसार, रस्त्याला त्यांचे नाव देण्यात येईल. त्यापूर्वी सावंत यांनी करनैल सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि करनैल सिंग यांच्या पत्नी चरणजीत कौर यांना 10 लाखांचा धनादेशही प्रदान केला.