रणवीर सिंहला ब्रॉक लेस्नरचा वकील कायदेशीर नोटीस पाठवणार, का? ते वाचा सविस्तर

सामना ऑनलाईन, मुंबई

WWE मधला प्रसिद्ध रेसलर ब्रॉक लेस्नर याच्या वकिलाने रणबीर सिंहला कायदेशीर नोटीस पाठवण्याचं ठरवलं आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या मुकाबल्यापूर्वी रणबीर सिंहने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळेच त्याला ही नोटीस पाठवण्यात येणार आहे.

रणवीर सिंहला याच ट्विट साठी नोटीस पाठवण्यात येणार आहे. या ट्विटमधील Eat.Sleep.Dominate.Repeat. हे वाक्य ब्रॉक लेस्नरच्या प्रसिद्ध घोषणावाक्यावरून उचललं असल्याचं लेस्नरच्या वकिलाचं म्हणणं आहे.

पॉल हेमन हे नाव WWE पाहणाऱ्यांना परिचित नाव आहे. हेमन लेस्नरचा वकील असून रणवीर सिंहने लेस्नरचं वाक्य चोरल्याचा त्याचा आरोप आहे. हेमनचं एकूण वर्तन पाहता हा सगळा प्रकार प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे अशी अनेकांना शंका आहे.