पवना धरण १०० टक्के भरले

सामना ऑनलाईन । पिंपरी

पिंपरी चिंडवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरल्याने पिंपरी चिंचवडकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणामध्ये सध्या ८.५१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र चातकाप्रमाणे दमदार पावसाची वाट पाहात आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पवना धरण क्षेत्रात पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने पाण्याचा साठा जलद गतीने वाढला. धरण परिसरात १ जूनपासून २ हजार ४३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ८.५१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. हैड्रोगेटद्वारे १ हजार ४५९.१९ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले आहे.