पवनेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

25

सामना ऑनलाईन, पिंपरी

मुसळधार पावसामुळे पवना धरणातून २८६७ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात पवना धरण परिसरात तुफान पाऊस झालाय. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण जुलैअखेरीस १०० टक्के भरले होते. आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा कोसळायला सुरूवात केली.

गेल्या २४ तासात  धरण परिसरात ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून धरण परिसरात ३३७४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २ मे पासून शहरात पाणीकपात केली होती. मात्र आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिंपरी-चिंचवडकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या