त्याला सगळं माहीत असूनही तो गप्प राहिला! पायल घोषचा इरफान पठाणवर आरोप

अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणाशी संबंधित ती अनेक दावे करत असून आता तिने क्रिकेटपटू इरफान पठाण याच्यावर आरोप केला आहे.

पायल हिने एक ट्वीट करून हा दावा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, कश्यप याने आपला बलात्कार केल्याचं मी इरफान पठाण याला सांगितलं नव्हतं. पण, आमच्यात जे बोलणं झालं ते सगळं मी त्याला सांगितलं होतं. सगळीकाही माहीत असूनही तो गप्पच आहे. कधीकाळी तो माझा चांगला मित्र असल्याचा दावा करायचा, असं पायलने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पायलने त्याच्यासोबत एक फोटोही शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, इरफानला टॅग करण्याचा अर्थ माझा काही हेतू आहे, असा नाही. पण इरफान एक असा माणूस आहे, ज्याच्यासोबत अनुराग कश्यपविषयी मी बरंच काही शेअर केलं होतं. कश्यप याने माझ्यावर केलेला बलात्कार वगळता मी त्याच्यासोबतच्या घटना इरफानला सांगितल्या होत्या, असा खळबळजनक दावा पायल हिने केला आहे. मी त्याची फक्त मैत्रीण नाही, तर आमची कुटुंबंही एकमेकांना ओळखतात. आता बघु कोण किती मैत्री निभावतं.

दरम्यान, दिग्दर्शक आनंद कुमार यांनी याबाबत ट्वीट करून पायलवरच आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पायल जे आरोप आता अनुराग कश्यपवर करत आहे. तेच आरोप तिने काही काळापूर्वी इरफान पठाण याच्यावर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या