पेटीएम डिजिटल फूड वॉलेट

16

विविध कंपन्या आणि विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या फूड कूपन्ससाठी पेटीएमने डिजिटल फूड वॉलेट आणले आहे. विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना जेवणासाठी तसेच किराणा मालासाठी सवलतीची कूपन्स अथवा काही रक्कम देत असतात. या कूपन्सच्या आधारे डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड अशा विविध ठिकाणी जेवण तसेच फास्ट फूडवर सवलत मिळते अथवा बिग बझारसारख्या ठिकाणी किराणा मालदेखील खरेदी करता येतो. आता ही कूपन पद्धतच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवण्याचा फंडा पेटीएमने आणला आहे. यामुळे आता एखादी कंपनी देशभरात कुठेही असलेल्या आपल्या कर्मचाऱयाच्या खात्यात असा भत्ता जमा करू शकते आणि तो कर्मचारी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जेवण वा किराणा ऑर्डर करून तो भत्ता खर्चदेखील करू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या