पाझर तलावाने धोक्याची पातळी ओलांडली, तीन गावांना धोका

23
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

राजापूर तालुक्यांतील झर्ये येथील पाझर तलावाने धोक्याची पातळी ओलांडल्याने धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गावातील कुरंग, कोंडगे, रिंगणे या ३ गाव पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हयात गेल्या चोवीस तासात ३८.२२ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे. जून महिन्याभरात १२९३.९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आकडे मिलीमीटर मध्ये आहेत. मंडणगड- १३.०० , दापोली- ५०.००, खेड- २४.००, गुहागर- २८.००चिपळूण-६५.००, संगमेश्वर- ७.००, रत्नागिरी – ४.००, लांजा १३.०० आणि राजापूर तालुक्यात १४०.०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

तहसीलदार राजापूर व पोलिसांनी या गावांची पाहाणी केली. त्यानंतर संभाव्य धोका ओळखून नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या