पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पीसीबी बक्कळ पैसा स्टेडियम बनवण्यासाठी खर्च करत आहेत. मात्र दुसरिकडे पाकिस्तानी खेळाडूंना (पुरुष आणि महिला) मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी खेळाडूंना मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे आता खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र दुसरिकडे 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ICC Champions Trophy च्या आयोजनासाठी पीसीबी स्टेडियम तयार करण्यावर बक्कळ पैसा खर्च करत आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, महिला टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानी महिलांचा संघ सहभागी झाला आहे. मात्र त्यांना सुद्धा मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. महिला खेळाडूंचा करार ऑगस्ट 2023 पासून जून 2025 पर्यंत आहे. मात्र जून 2024 पासून आतापर्यंत त्यांना पगार मिळालेला नाही.