‘पीसीबी’ही करणार वयस्कांना ‘आऊट’

22

सामना ऑनलाईन,कराची

लोढा समितीच्या शिफारशीनुसार ७० वर्षांवरील अधिक वयाची व्यक्ती ‘बीसीसीआय’मध्ये कार्यरत राहू शकत नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डही (पीसीबी) आपल्या पदाधिकाऱयांसाठी ७० वर्षांची सीमारेषा आखण्याबाबत विचार करत आहे.त्यामुळे लवकरच ‘पीसीबी’मधूनही वयस्क पदाधिकारी ‘आऊट’ होणार आहेत.

‘पीसीबी’चे विद्यमान अध्यक्ष शहरयार खान हे ८२ वर्षांचे आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इंतिखाब आलम यांचाही संघाच्या मॅनेजरपदाचा करार संपविण्यात आला आहे. कारण ते ७६ वर्षांचे होते. ‘पीसीबी’ने ६८ वर्षीय वसीम बारी यांना पाकिस्तानी संघाचे मॅनेजर बनवले आहे. ‘पीसीबी’चे सर्व नवीन पदाधिकारी हे ७० वर्षांच्या आतील असतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या