मोरपंख

> ज्या ठिकाणी मोर असेल तेथे वाईट शक्ती किंवा प्रतिकूल गोष्टी राहात नाहीत असं म्हटलं जातं. म्हणूनच  घरांमध्ये लोक मोरपंख ठेवतात.

> इंद्रदेवाचे मोरपंखाच्या सिंहासनावर बसणे, कृष्णाने मोरपंख आपल्या मुकुटामध्ये धारण करणे, पौराणिक काळात महर्षींनी मोरपंखानेच मोठमोठे ग्रंथ लिहिणे… यामुळे मोरपंखाची उपयुक्तताच स्पष्ट होते.

> विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चिमात्य राष्ट्रांमधील लोक मोरपंख म्हणजे दुर्भाग्याचं प्रतीक मानत असत. वास्तविक आपल्याकडे मोराच्या सुंदर पंखांचा संबंध भाग्याशी जोडला जातो.

> ग्रीक लोक मोरपंखाचा संबंध स्वर्ग आणि ताऱ्यांशी जोडतात. हिंदू धर्मात मोर हा लक्ष्मीशी संबंधित आहे.

> लक्ष्मी देवी सौभाग्य, सुख, विनम्रता आणि धैर्याचे प्रतीक मानली जाते. यासाठी लोक मोरपंख आपल्याजवळ ठेवतात.

> आशिया खंडात अनेक देश मोरपंखांचा संबंध अध्यात्माशी जोडतात.

> मोर आपले पंख उघडून सौंदर्य पसरवतो. माणसाचं मनही असंच विचारांच्या बाबतीत मोकळं, खुलं असायला हवं. प्रत्येकाच्या मनात सर्वांसाठी प्रेम असलं पाहिजे, असं बौद्ध धर्म सांगतो.

> ख्रिस्ती धर्मात मोराचे पंख अमरत्व आणि आध्यात्मिक शिक्षणाशी संबंधित आहेत, तर इस्लाम धर्मात जन्नतच्या दरवाजाबाहेरील अद्भुत शाही बागेचे प्रतीक आहेत.

> मोरपंखांमुळे घरात किडे-किटक येऊ शकत नाहीत.